राज्यात शिक्षक भरती रखडली ; पात्र उमेदवारांमध्ये नाराजी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणारी शिक्षक भरती आरक्षण बदल व करोनामुळे पुन्हा रखडली आहे. शिक्षकांच्या चार हजारांहून अधिक जागांची भरती प्रक्रिया होणे बाकी आहे.
सरकारला या भरीतीचा अजूनही मुहूर्त न सापडल्याने पात्र उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे.
नवीन भरती प्रक्रिया राबवण्याच्या प्रक्रियेतच सावळा गोंधळ सुरू आहे. त्यामुळे याचा परिणाम भावी शिक्षकांवर होत आहे. केवळ पारदर्शकतेच्या नावाखाली एकाच भरती प्रक्रियेला चार-पाच वर्षे लागत असल्याने सरकारविरोधात तीव्र नाराजी आहे. राज्यात शिक्षक भरती करण्यासाठी डिसेंबर २०१७ मध्ये परीक्षा घेण्यात आली. चार वर्षे लोटत आली तरी पवित्र पोर्टलची प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही. तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या काळात सुरू झालेली ही भरती प्रक्रिया माजी मंत्री आशीष शेलार आणि आता विद्यमान शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांच्यापर्यंत पोहोचली आहे.
राज्यात सेना-भाजपचे सरकार बदलून महाविकास आघाडीचे सरकार आले. तरी शिक्षक भरतीचा हा खेळ सुरूच आहे. या ना त्या कारणाने भरती पुढे ढकलण्यात आली. तत्कालीन सरकारने शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित केले. आतापर्यंत या पोर्टलवर दीड लाख उमेदवारांनी नोंद केली आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, माध्यमिक व प्राथमिक शाळांनी पोर्टलवर जाहिरातीही प्रसिद्ध केल्या. पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी शिक्षकांची राज्यातील खासगी शैक्षणिक संस्थांनी मुलाखतीशिवाय गुणवत्तेनुसार निवड करण्यास संमती दर्शवली आहे.
यादी जाहीर करा
राज्यातील ५६१ व्यवस्थानाच्या सुमारे २ हजार ६२ रिक्त पदांसाठी सप्टेंबर २०२१ मध्ये मुलाखतींसह पदभरतीसाठी शिफारस करण्यात आली. त्यानंतर अद्यापी संस्थेसाठी लॉगिन उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी पवित्र पोर्टलवर जाहीर करावी. विनामुलाखतीच्या रिक्त पदांची प्रवर्गनिहाय व विषयनिहाय माहिती उपलब्ध करून देण्यात यावी. खासगी संस्थांची शिक्षक भरती पवित्र पोर्टलमार्फतच करावी. त्यात कुठलाही बदल करण्यात येऊ नये, अशा मागण्या शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी केल्या आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..