पोलिसांच्या बदल्यांवर देशमुखांच्या अवाजवी प्रभाव….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या कार्यकाळात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांवर अवाजवी प्रभाव ठेवल्याचे पुरावे आहेत, असे मत विशेष न्यायालयाने गुरुवारी देशमुख यांच्या जामीन याचिकेवरील तपशीलवार आदेशात नमूद केले.
मनी लाँड्रिंग प्रकरणात देशमुख यांना जामीन नाकारताना विशेष न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी त्यांच्या आदेशात ही बाब नमूद केली. देशमुख यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोव्हेंबर २०२१ मध्ये मनी लॉड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक केली होती. त्यांचा जामीन अर्ज १४ मार्च रोजी फेटाळण्यात आला होता.
बदल्या आणि नियुक्तयासंबंधी पोलिस अधिकाऱ्यांची अनधिकृत यादी देशमुख यांच्या सांगण्यावरून तयार केली जायची. ती पोलीस आस्थापना मंडळाकडे पाठवली जायची. मंडळाने तयार केलेल्या अंतिम यादीत देशमुखांकडून प्राप्त शिफारशी समाविष्ट केल्या जात होत्या. प्रथमदर्शनी देशमुख मनी लाँड्रिंगच्या कामात सहभागी असल्याचे दर्शवणारे पुरावे आहेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
चांदीवाल आयोगाची सुनावणी पूर्ण
शंभर कोटी वसुलीप्रकरणी राज्य शासनाने नेमलेल्या चांदीवाल आयोगाची चौकशी पूर्ण झाली आहे. यानंतर आता हा चौकशी अहवाल राज्य शासनाकडे पाठवला जाणार आहे. राज्य सरकार यावरून काय निर्णय घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या तुरुंगात आहेत. गुरुवारी याप्रकरणी अंतिम सुनावणी पार पडली. यावेळी मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख चांदीवाल आयोगासमोर आज हजर झाले होते. आता आयोग आपला निर्णय सीलबंद लिफाफ्यात महाराष्ट्र सरकारला सुपूर्द करणार आहे.

राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….