नाशिकसह नागपूरात ही पाऊस ; “या” जिल्ह्याना अलर्ट जारी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं (IMD) वर्तवला होता. त्यानुसार नागपुरात (Nagpur) आजूबाजूच्या परिसरात पावसाच्या हलक्या सरी, तर नाशिक (Nashik), कळवणमध्ये गारांसह पावसाने हजेरी लावली.
तसेच येत्या तीन ते चार तासांत आणखी काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
नाशिक, सातारा, पुणे, सोलापूर, सांगली, बीड, अहमदनगर, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, अमरावती , यवतमाळ आणि आजूबाजूच्या काही भागात ढगाळ वातावरण होते. काही तासांपूर्वी नाशिक, कळवणमध्ये मुसळधार पाऊस झाला. तसेच नागपुरातही विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. येत्या तीन ते चार तासांत पुन्हा पुणे, नाशिकसह साताऱ्यात घाट माथ्यावर वादळ, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच सकाळपासून ढगाळ वातावरण असलेल्या जिल्ह्यात देखील पावासाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे जोरदार वारे वाहत आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील कोकण, मराठवाडासह उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत तुरळक पावसाची नोंद झाली आहे. या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसत असून या हंगामातील पिकांचे नुकसान होतं आहे. राज्यातील काही प्रदेशात गारपीट होत असल्याने पिकांवर याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असा अंदाजही वर्तवला जात आहे. ऐन हंगामात कोकणात हलक्या सरी बरसल्या. तसेच नाशिक परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..