एसटी संपकऱ्यांवर २२ मार्च पर्यंत कारवाई नको ; हायकोर्टाचे निर्देश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या मुद्द्यावरून त्रिसदस्यीय समितीने सादर केलेला अहवाल स्वीकारणार की नाही, असा सवाल करत हायकोर्टाने शुक्रवारी सरकारला २२ मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.
तसेच आजपासून २२ मार्चपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करू नका, असेही निर्देश कोर्टाने दिले.
मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने या अहवालाचे काय केले, अशी विचारणा करताच सरकारी वकिलांनी सांगितले की, मंत्रिमंडळाने हा अहवाल विधानसभेत मांडायला सांगितला. अहवाल विधानसभेत मांडण्यात आला. विधानसभा व विधानपरिषदेचे सदस्य मिळून अशी एक समिती स्थापण्यात आली. या समितीने परिवहन मंत्र्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. मात्र, परिवहन मंत्र्यांनी काही दिवसांची मुदत मागितल्याचे सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितले. अहवाल स्वीकारणार की नाही, यावर मंत्रिमंडळाने निर्णय घेतला का, अशी विचारणा खंडपीठाने केली.
शिस्तभंगाची कारवाई करू नका
n अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने अहवालाबाबत निर्णय घेण्यात आला नाही. मंत्रिमंडळाची बैठक २२ मार्चला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच निर्णय घेऊ, असे सरकारी वकिलांनी हायकोर्टाता सांगितले.
n कर्मचाऱ्यांच्या वतीने ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात सांगितले की, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करत आहे. त्यावर हायकोर्टाने २२ मार्च रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई न करण्याचे निर्देश एसटी महामंडळाला दिले.
एसटीचे शासनात विलिनीकरण व अन्य मागण्यांसाठी कर्मचारी ऑक्टोबरपासून संपावर आहेत. मागण्यांबाबत विचार करण्यासाठी हायकोर्टाच्या आदेशानुसार सरकारने त्रिसदस्यीय समितीही नेमली. या समितीने काही दिवसांपूर्वी कोर्टात अहवाल सादर केला. सरकारनेही विलिनीकरणाची मागणी वगळता बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत.

सरकारमध्ये दोनच खाती महत्त्वाची’, बावनकुळेंची राष्ट्रवादी शिवसेनेवर कुरघोडी, नेमका इशारा काय….?
‘तुम तो ठहरे परदेसी साथ क्या..’ या सुपरहिट गाण्याचे गीतकार जहीर आलम काळाच्या पडद्याआड…..
थलपती विजय यांच्यासह १० जणांनी घेतली शपथ, मंत्रीमंडळात तरूणांना मोठी संधी; मंत्र्यांची यादी आली समोर…
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच विजय यांचे तीन धडाकेबाज निर्णय, कोणत्या फाइलवर केली पहिली सही..?
‘राज ठाकरे तुझे विचार माझ्या पायाच्या बुटाच्या धुळीबरोबर आहेत…’, सदावर्ते हे काय बोलून गेले..?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी सुरक्षा यंत्रणांची उडाली झोप..! पुलाखाली सापडली स्फोटके ; मोठा अनर्थ टळला….