कृषी क्षेत्रात महिलांच्या कुशल व्यवस्थापन व निर्णय क्षमतेचा उपयोग करा कृषी विकास कार्यशाळेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे प्रतिपादन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 10 मार्च, :- शेतीमध्ये विविध प्रकारची कामे करताना महिलांच्या कुशल व्यवस्थापनाचा उपयोग केल्यास व शेतीच्या कामामध्ये महिलांची निर्णय घेण्याचे क्षमतेचा वापर केल्यास त्याचा फायदा कुटुंबासाठी तसेच समाजासाठी होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्नात नक्कीच वाढ होईल असे मत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन विभागीय कृषी संशोधन केंद्र वाघापूर रोड यवतमाळ या ठिकाणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा यांच्या कार्यालयाच्या वतीने 8 मार्च रोजी करण्यात आले होते. सदर कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे तसेच जिल्हा परिषद सदस्य सौ रेणू शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यशाळेमध्ये पुढे मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महिलांसाठी असलेले वेगवेगळे कायदे व विविध योजना तसेच महिलांचे अधिकार, स्त्री पुरुष समानता या विषयावर माहिती दिली.
जिल्हा परिषद सदस्य रेणू शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या महिलांकरीता राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, ग्रामीण राजकारण तसेच अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचा असलेला सहभाग याविषयी मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्मा प्रकल्प संचालक नवनाथ कोळपकर यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध बाबीची माहिती आपल्या प्रास्ताविकात दिली.
कार्यशाळेमध्ये जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारच्या चार घडीपत्रिका चे विमोचन करण्यात आले.
याप्रसंगी अमोलकचंद विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या तथा जिल्हा स्तरीय विशाखा समितीच्या अध्यक्षा सुप्रभा यादगीरवार, प्रगतिशील तूर उत्पादक शेतकरी माणिकरावजी कदम, सेवानिवृत्त न्यायाधीश जिल्हा ग्राहक मंच विजयसिंह राणे, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ.प्रमोद यादगिरवार, डॉ. जयश्री उघाडे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सुरेश नेमाडे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे संचालन मंडळ कृषी अधिकारी निलेश राठोड यांनी केले तर उपस्थितांचे आभार कृषी अधिकारी अनिल राठी यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेला विनोद इंगोले, उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी जगदीश चव्हाण, प्रगतीशील शेतकरी विनोद मैद, शंतनु देशकर, कृषी उपसंचालक तथा उपविभागीय कृषी अधिकारी तेजस चव्हाण उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. प्रशांत नाईक, श्री. कुमरे, रमेश पिंपरखेडे प्रकल्प विशेषज्ञ पोक्रा, जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकारी, कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आलेल्या 350 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कार्यशाळेमध्ये उपस्थिती नोंदवली त्यामध्ये महिला शेतकऱ्यांची संख्या उल्लेखनीय होती.
सदर कार्यशाळेचे यशस्वीतेसाठी देवानंद खांदवे, अविनाश कांबळे, निवृत्तीनाथ मांजरे, हरी देशमुख, सीमा अवझाडे, शारदा गुल्हाने, अनिल मोटघरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..