महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प आज सादर करणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आज महाविकासआघाडी सरकार मांडणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) सादर करतील. यावेळी ते राज्यातील विविध भागांतील विकासकामांसाठी कोणत्या घोषणा करणार, याकडे सामान्य जनतेचे लक्ष आहे.
नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलवरी उत्पादन शुल्क कमी केलं. त्याला आता तीन महिने उलटले, तरी राज्य सरकारनं इंधनावरील कर कमी करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. आजच्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं अजित पवारांकडे जनतेला दिलासा देण्याची नामी संधी चालून आली आहे. आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार.

काल विधीमंडळात सादर झालेल्या राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार पुढील वर्षी राज्याच्या विकासाचा दर सुमारे 12 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्थात राज्याच्या एकूण उत्पन्नात कोव्हिड काळाच्या तुलनेत घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नातील ही वाढ वापरुन इंधनावरील कर कमी करुन अजित पवार जनतेला दिलासा देतील, अशी अपेक्षा व्यक्त आहे. तुर्तास राज्यातील पालिका निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असल्या तरी राज्य सरकारला सहा महिन्यांनी या निवडणुकांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प संबधित पालिकांच्या परिसरात घोषणा आणि प्रकल्पांची उधळण करण्यात येणार का, हे पाहावे लागेल. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) वर्ष २०२२-२३ वर्षाचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करतील. दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत तर अर्थ राज्य मंत्री शंभुराजे देसाई विधान परिषदेत सादर करतील.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….