वक्फ जमीनीवर कब्जा करणाऱ्या भू-माफिया वर कार्यवाही करणार :- आ.डॉ. वजाहत मिर्झा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- औरंगाबाद येथे मंडळाची तीन दिवसीय बैठक 25,26 व आज 27 रोजी पार पडली.यात मंडळाचा पारदर्शक कारभार,उत्पन्न वाढी वर भर देणे,पद भरती,अतिक्रमित वक्फ जमीन ताब्यात घेणे आणि भूखंड माफिया वर कायदेशीर कारवाई करण्याचे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
मंडळाने आता पर्यंत 14 गुन्हे दाखल केले असून अनेक प्रकरणांची कायदेशीर बाजू तपासली जात आहे त्या नंतर अश्या प्रकरणात ही लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील महाराष्ट्र वक्फ मंडळाच्या अनेक जागा वर काही भूखंड माफियांनी अवैध अतिक्रमण केले आहे.त्यांच्या वर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.तसेच शासन आदेशान्वये येत्या चार ते सहा महिन्यात मंजूर 179 पदे ही भरण्याचा निर्णय वक्फ मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला आहे.अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर वजाहत मिर्झा यांनी दिली.
औरंगाबाद येथे मंडळाची तीन दिवसीय बैठक 25,26 व आज 27 रोजी पार पडली.यात मंडळाचा पारदर्शक कारभार,उत्पन्न वाढी वर भर देणे,पद भरती,अतिक्रमित वक्फ जमीन ताब्यात घेणे आणि भूखंड माफिया वर कायदेशीर कारवाई करण्याचे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मंडळाने आता पर्यंत 14 गुन्हे दाखल केले असून अनेक प्रकरणांची कायदेशीर बाजू तपासली जात आहे त्या नंतर अश्या प्रकरणात ही लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. 26 व 27 रोजी वक्फ वक्फ संस्थांच्या संबंधित वाद संदर्भात सुनावणी घेण्यात आली.पहिल्या दिवशी 15 व दुसऱ्या दिवशी 23 प्रकरणांची सुनावणी घेण्यात आली पैकी ऐशी टक्के प्रकरणे निर्णया साठी राखीव ठेवण्यात आले.या वर पुढच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.वीस टक्के प्रकरणे स्थगित करण्यात आली.
शासनाने गेल्या 24 फेब्रुवारी रोजी 179 पदे भरती करण्यात साठी मंजुरी दिली आहे.शासन निर्णयांच्या अधीन राहून पदांची भरती बाबत लवकरच प्रस्ताव शासन कडे मंजुरी साठी पाठविण्यात येणार आहे.पद भरती करतांना वक्फ मंडळास वेतन द्यावा लागणार आहे.त्या मुळे नवीन पद भरती करतांना उत्पन्न वाढी साठी विशेष लक्ष देण्यात येणार असल्याची माहिती ही डॉ.वजाहत मिर्जा यांनी दिली.भरती नंतर मंडळाचा कामकाज अधिक गतिशील होईल,त्या मुळे लोकांना भविष्यात अडचणींचा सामना करावा लागणार नाही,अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.या वेळी अध्यक्ष डॉ.वजाहत मिर्जा,सदस्य व खासदार डॉ.फौजिया खान मॅडम,मुदसीर लांबे,शाकेर हसनैन, सय्यद अथहर अली,समीर गुलाम नबी काजी, आमदार फारूक अनवर शहा,ए.यु.पठाण,इम्तियाज मुश्ताक काजी,मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख,उप मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद शेख व मंडळाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….