हैदराबाद येथील जिन्ना टॉवरला दिला “तिरंगा” रंग…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हैदराबाद :- नामकरणावरून वादात असलेल्या जिन्ना टॉवरला आता तिरंग्याच्या रंगात रंगवण्यात आलं आहे.
आंध्र प्रदेशातील गुंटूरमध्ये महात्मा गांधी मार्गावर जिन्ना टॉवर आहे. आता तो तिरंग्यात रंगवल्यानंतर त्यावर तिरंगा फडकावण्याची तयारी करण्यात आल्याचे समजते. गुंटुर पूर्वचे आमदार मोहम्मद मुस्तफा यांनी सांगितलं की, याबाबत अनेक संघटनांना विनंती करण्यात आली होती. त्यानतंर आम्ही जिन्ना टॉवर तिरंग्यात रंगवण्याचा निर्णय घेतला. तसंच राष्ट्रध्वज फडकावण्यासाठी एक खांबही उभा केला आहे. गुरुवारी त्यावर तिरंगा फडकावण्यात येईल.
दरम्यान, मुस्तफा यांनी मंगळवारी गुंटुरच्या महापौरांसह टॉवरच्या सुरक्षेचा आढावा घेतला. त्यांनी म्हटलं की,’ स्वातंत्र्य लढ्यावेळी मुस्लिमांच्या दिग्गज नेत्यांनी इंग्रजांचा सामना केला होता. स्वातंत्र्यानंतर काही मुस्लिम देश सोडून पाकिस्तानमध्ये गेले पण आम्ही देशातच राहणं पसंत केलं. आमचं मातृभूमीवर प्रेम आहे.’

जिन्ना टॉवरवर २६ जानेवारी रोजी काही लोक चढले होते. त्यांनी जबरदस्तीने तिरंगा फडकावण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी काही लोकांना ताब्यातही घेतलं होतं. तर आंध्र प्रदेश भाजपने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात गुंटुर महानगर पालिकेकडे जिन्न टॉवरचं नाव बदलण्याची मागणी केली होती. टॉवरचे नाव माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम असं करण्यात यावं अशी मागणी त्यांनी महापालिकेकडे केली होती.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..