हिंगोलीत भाजपने काढली नाना पटोले यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिंगोली :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अपशब्द वापरल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.
याचे पडसाद हिंगोलीमध्ये सुद्धा उमटले आहेत. सोमवारी (ता.२४) हिंगोलीचे आमदार तान्हाजी मुटकुळे (Tanhaji Mutkule) यांच्या नेतृत्वाखाली शहरामधून नाना पटोले यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. हिंगोली (Hingoli) शहराच्या मुख्य रस्त्यावरून ही अंत्ययात्रा काढण्यात आली. दरम्यान आंदोलकांनी पटोले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली. यावेळी भाजपच्या (BJP) अन्य पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पटोले यांच्या डोक्यावर आता परिणाम झाला आहे. अकोला येथील केळकर यांच्या रुग्णालयात डोक्यावर उपचार सुरू करण्यासाठी पाठविण्यात यावे. कारण की पूर्णता ते पागल झालेले आहेत.
पुढे त्यांच्या बोलण्याकडे कुणीही लक्ष देऊ नये, असा सवाल आमदार तानाजी मुटकुळे यांनी केला आहे. यावेळी मुटकुळे यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पु चव्हाण, संघटन सरचिटणीस फुलाजी शिंदे, जिल्हा सरचिटणीस मिलिंद यंबल, शहराध्यक्ष प्रशांत सोनी गोल्डी, खरेदी विक्री संघाचे ऊमेश नागरे , सरचिटणीस संदीप वाकडे, ओबीसी महिला सचिव रजनी पाटील, तालुकाध्यक्ष संतोष टेकाळे, अशोक ठेंगल, हमीद भाई प्यारेवाले, बाळु नाईक, बाबा घुगे, संजु ढोके, माजी सैनिक गजानन कावरखे, सुमित घिके, नारायण खेडेकर, शाम खंडेलवाल, आशिष जैस्वाल, गजानन काळे, माणिक लोडे, उज्ज्वला खोलगाडे, बंटी राठोड, पप्पु देवकते आदी कार्येकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….