सन 2014 च्या नंतर भाजपाप्रणित युतीने दिलं पहिला मुस्लिम उमेदवार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
लखनऊ :- सन २०१४ मध्ये केंद्रात सत्तेत आल्यानंतर भाजपप्रणित युतीच्यावतीनं (BJP Alliance) मुस्लिमांना उमेदवारी नाकारण्यात येत होती, पण आता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपसोबतच्या अपना दलाकडून ( Apna Dal ) एक मुस्लीम उमेदवार देण्यात आला आहे.
हैदर अली खान असं अपना दलच्या उमेदवाराचं नाव असून तो सुआर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. या मतदारसंघासाठी सातव्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. हैदर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्या नूर बानो यांचे नातू आहेत. हैदर हे यासाठी चर्चेत आले आहेत कारण ते असे पहिले मुस्लीम उमेदवार बनले आहेत ज्यांना २०१४ नंतर भाजपप्रणित युतीनं पहिल्यांदच उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी तिकीट दिलं आहे.
३६ वर्षीय हैदर यांना काँग्रेसकडून उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आलं होतं. पण त्यांनी काँग्रेसला रामराम करत अनुप्रिया पटेल यांच्या अपना दलमध्ये प्रवेश केला. यानंतर आता अपना दलनं त्यांना उमेदवारी दिली आहे. हैदर अली खान हे अब्दुल्ला आझम यांच्याविरोधात लढणार आहेत. जे समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते आझम खान यांचे पुत्र आहेत.
हैदर हे रामपूरच्या राजघराण्याचे वारस असून युकेच्या एस्सेक्स विद्यापीठातून त्यांनी पदवी संपादन केली आहे. हैदर यांचे वडील नवाब काझीम खान हे उत्तर प्रदेशमध्ये सोआर येथून विधानपरिषदेवर आमदार होते. तर बिलासपूर येथून चार वेळा आमदार राहिले आहेत.

राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….