मग बाळासाहेबांनी शिवसेना सडवली का…? ; फडणवीसांचे ठाकरेंना प्रत्युत्तर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- बाळासाहेब ठाकरेंच्या जंयतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.
आम्ही २५ वर्ष युतीत सडलो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावरूनच आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
सोयीचा इतिहास आणि निवडक गोष्टींचा विसर मुख्यमंत्र्यांच्या भाषणात दिसला. २०१० ते २०१२ पर्यंत बाळासाहेब ठाकरे हे युतीमध्ये होते. त्यांनी या युतीचा निर्णय घेतला होता. त्यांच्या हयातीत त्यांनी युतीचा निर्णय कायम ठेवला. पण शिवसेना सडली याचा अर्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या निर्णयावर बोट दाखवताय का? बाळासाहेबांनी शिवसेनेला युतीत सडत ठेवलंय का? असं उद्धव ठाकरेंना वाटतं का? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला.
शिवसेनेच्या आधी आमचा नगरसेवक होता. लोकसभेची निवडणूक शिवसेनेनं भाजपच्या चिन्हावर लढवली. मनोहर जोशी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढले. भाजपसोबत असताना शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला तर यांनी भाजपला सोडल्यानंतर चौथ्या क्रमांकाचा पक्ष झाला. म्हणजे हे कोणासोबत सडले, हे दिसतंय, असंही फडणवीस म्हणाले. राम जन्मभूमीच्या वेळी आम्ही लाठ्या काठ्या खात होतो. राम मंदिराचा विषय मोदींनी सोडवला. तुमचं हिंदूत्व बेगडी आहे. भाषणाच्या पलीकडे तुमचे हिंदूत्व नाही, अशी टीकाही फडणवीसांनी केली.
भाजप स्वतःच्या भरवशावर आपलं सरकार बनवेल आणि वेगळं लढून देखील नंबर एक भाजप आहे हे आम्ही दाखवले. 2002 साली 39 उमेदवार लढवले आणि सर्वांचे डिपॉझिट जप्त झाले. तुम्ही जागा लढवल्या. पण तुम्हाला लोकांनी नाकारले. राम जन्मभूमीत संघ परिवार आणि विचारातले लोक होते. राज्यातील शासनावर लक्ष द्या. राज्याची अवस्था वाईट झाली आहे. तुम्हाला चौथ्या क्रमाकाचा पक्ष बनल्याची निराशा आहे. पण ते अशी बाहेर काढू नका, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..