“सरकारवर विश्वास ठेवा , संप मागे घ्या” शरद पवारांचे एसटी कर्मचाऱ्यांना आव्हान…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एसटी संपबाबत बैठक घेतली. यांनतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांसोबतच सामान्य नागरिकांचेही अतोनात हाल झाले आहेत.
त्यामुळे कामावर रुजू व्हा, संप मागे घ्या. मागण्या मान्य होतील. असे आश्वासन शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे.
तसेच एसटी कर्मचाऱ्यांसोबतच प्रवाश्यांचे हितही महत्वाचे आहे. एसटी संपूर्ण सुरु झाल्यानंतर कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांचा विचार केला जाईल. मात्र विलीनीकरणाच्या मुद्द्यावर कर्मचारी अडून बसले आहेत. मात्र विलीनीकरण हा न्यायप्रविष्ट विषय आहे. त्यावर आताच बोलू नाही शकत असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान शरद पवारांच्या उपस्थितीत २२ कर्मचारी संघटनांसोबत बैठक झाली. दरम्यान कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार नाही, असे आश्वासनही शरद पवार यांनी दिले आहे. महाराष्ट्रातील प्रवासी वर्ग अत्यंत महत्वाचा आहे. मात्र एसटी संपामुळे मागील दोन महिन्यांपासून प्रवाश्यांचे हाल झाले आहेत. एसटी संपावर तोडगा काढण्याचा सरकारने सर्वोत्तपरी प्रयत्न केला. त्यामुळे कामावर परत या, एसटी पूर्वपदावर आणा. सर्व मागण्या पूर्ण होतील. असे आश्वासन शरद पवार यांनी दिले आहे. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..