पवारांकडे असे कोणते संवैधानिक पद आहे कि ते एसटी संपाबाबत सह्याद्री वर बैठक घेत आहे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ सुरु असलेल्या एसटी संपबाबत आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर आज बैठक होणार आहे. मात्र या बैठकीवरूनच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी पवारांवर निशाना साधला आहे.
‘शरद पवार यांच्या उपस्थितीत एसटी संपाबाबत मह्त्त्वाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर आज दुपारी १२.३० वाजता बैठक होणार आहे. मात्र शरद पवारांकडे महाराष्ट्र शासनाचे असे कोणते संविधानीक पद आहे ज्यामुळे ते एसटी संपाबाबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेणार आहेत? मुख्यमंत्री काय करतायत?’ असे ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.
दरम्यान वारंवार आवाहन करूनही संपावरील कर्मचारी कामावर परत येत नसल्याने आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने खासगी चालकांची भरती प्रक्रिया सुरू केली असून रविवारी नागपूर विभागात ६ चालकांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे संप सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच चंद्रपूर, अमरावती येथे फेऱ्या पाठविण्यात आल्या आहेत. तर अजूनही अनेक कर्मचाऱ्यांना नोटीशी पाठवण्यात येत आहेत. दरम्यान आज होणाऱ्या बैठकीत यावर काही ठोस पर्याय निघण्याची शक्यता आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..