देशात कोरोनाचे नवे निर्बंध…? ; पंतप्रधान मोदींनी आज बोलावली महत्वाची बैठक…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली : देशात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. गेल्या २४ तासांत दीड लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
त्यामुळे चिंता वाढली असून देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आज सायंकाळी साडेचार वाजता महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत देशात नवे निर्बंध लावण्यातबाबत निर्णय होणार आहे का? याकडे लक्ष लागलं आहे.
गेल्या २४ तासांत दिवसभरात देशात १ लाख ५९ हजार ४२४ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ४० हजार ८६३ जण कोरोनामुक्त झाले. तसेच कोरोनामुळे ३२७ जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्हीटी रेट १०.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे मोदींनी महत्वाची बैठक बोलावली असून यामध्ये राज्यांना निर्बंधांबाबत नवे निर्देश देण्यात येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि दिल्लीत आहेत. त्यामुळे चिंता अधिकच वाढली आहे. महाराष्ट्र सरकारने कोरोनाबाबत नवे निर्बंध जारी केले असून १० जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. महाराष्ट्रात सकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे, तर रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक सभांवर देखील बंद घातली असून लग्नावर देखील काही निर्बंध आहेत. आता मोदींच्या बैठकीनंतर राज्याला आणखी काय सूचना येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..