व्हॉट्सॲपवर आत्महत्येचे स्टेटस ठेवून पड़णाऱ्या युवकांवर गुन्हा दाखल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- शहरातील समर्थवाडी परिसरात किरायाने खोली करून राहणाऱ्या युवकाने ‘माझ्या जीवनातील शेवटचा व्हॉट्सॲप स्टेटस’ असा मॅसेज व्हायरल केला व तो घरून बेपत्ता झाला.
त्याने मोबाईल बंद केले. त्याच्या भावाने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आढळून आला. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी कलम ३०९ भादंविनुसार गुन्हा नोंदविला आहे.
तारासिंग भीमसिंग राठोड (३०) रा. बोरगाव दाभडी, ता. आर्णी असे पसार झालेल्या युवकाचे नाव आहे. तारासिंगने स्वत:च्या मोबाईलवर आत्महत्या करत असल्याचे स्टेटस ठेवून फोन बंद केला. यामुळे त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून तारासिंगचा शोध घेण्याचा विनवणी केली. यासाठी तारासिंगच्या कुटुंबीयांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्या बंगल्यावरही धडक दिली. यावरून त्याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली. तारासिंगचा शोध घेण्यासाठी सायबर सेलची मदत घेण्यात आली. तो धामणगाव रेल्वे येथून शेगावला गेल्याची माहिती मिळाली. अवधूतवाडी ठाण्याच्या शोध पथकाने शेगाव गाठून त्या युवकाला ताब्यात घेतले.
तारासिंगने नातेवाइकांच्या पैशांची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली. त्यात त्याचे नुकसान झाले. तो यवतमाळात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी राहत होता. यापूर्वीही तो असाच स्टेटस ठेवून पसार झाला होता. त्याने अनेकांकडून कर्जाऊ रक्कम घेतली. ती उधारी फेडणे शक्य होत नसल्याने तो आत्महत्या करत असल्याचे सांगून बेपत्ता होतो.
विहिरीत उडी टाकली म्हणून पोलिसांना सापडला
– घरुन निघून गेलेल्या तारासिंगने शेगाव येथे रेल्वे स्टेशनजवळील एका शेतातील विहिरीत उडी टाकली. तेथे हजर असलेल्या नागरिकांनी त्याला विहिरीतून बाहेर काढले, असेही तारासिंगने पोलिसांना सांगितले. यावरून तारासिंगविरुद्ध अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..