गारपिठीमुळे पिकांचे नुकसान ; आज सकाळीच पावसाने विदर्भात जोरदार हजेरी लावली….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाने विदर्भात जोरदार हजेरी लावली. अमरावती , वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा बसला आहे.
तसेच आज देखील यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात सकाळीच पावसाला सुरुवात झाली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी , पुसद तालुक्यासह शहरात आज पहाटेपासूनच पावासाला सुरुवात झाली आहे. अमरावतीत शनिवारपासूनच पाऊस अधूनमधून हजेरी लावत असून आज सकाळी देखील पावसाचे जोरदार आगमन झाले. भंडारा आणि नागपूर जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे.
‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’मुळे सध्या विदर्भात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हवामान विभागाने खरं तर रविवारपासून वादळी पावसाचा इशारा दिला होता. मात्र वरुणराजाने एक दिवस अगोदरच मुहूर्त साधला. अमरावती, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात गारपीट झाली. अमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा संभू परिसरातील साऊर, कळमगव्हाणा, लसणापूर, रामा, पुसद , शिराळ्यात गारांसह पाऊस झाला. याचा तूर आणि हरभऱ्याला मोठा फटका बसला आहे.या भागात अर्धा ते पाऊण तास गारांसह पाऊस झाला. नेरपिंगळाई येथे झालेल्या गारपिटीत कांदा, गहू, संत्रा, कापूस या पिकांचे नुकसान झाले. मृगाचा संत्रा गळून पडला.
वर्धा जिल्ह्यातही पिकांचं नुकसान –
जिल्ह्यातील आष्टी आणि कारंजा तालुक्यात वादळी पावसात बोराएवढ्या गारा पडल्या. आष्टी तालुक्यातील खडकी, टोकोडा, भारसवाडा, परसोडा, वाघोली, शिरसोळी, नरसापूर, किन्हाळा आदी भागात जोरदार पाऊस झाला. कारंजा तालुक्यातील पारडी, एकांबा, बोटोणा, सारवाडी, पालोरा, राजणी, बोंदरठाणा या गावात पावसासह गारा पडल्याने पिकांचे नुकसान झाले.
नागपुरातही जोरदार पाऊस –
नागपुरात शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, सायंकाळी सातच्या सुमारास अचानक आभाळ भरून आले. पाहतापाहता विजांचा प्रचंड कडकडाट व मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरवात झाली. जवळपास अर्धा तास शहरात विशेषतः पश्चिम नागपुरातील गोधनी, झिंगाबाई टाकळी व मानकापूरसह आजूबाजूच्या परिसरात तुफान पाऊस बरसला. या भागांत हलक्या गाराही पडल्या.

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….