चंद्रशेखर बावनकुळेनी घेतली विधानपरिषद सदस्य पदाची शपथ ; म्हणाले…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज(६ जाने.) विधानपरिषद सदस्य पदाची शपथ घेतली असून यावेळी बोलत असतांना लोकसेवेसाठी माझे आयुष्य समर्पित आहे, असे बावनकुळे म्हणाले आहेत.
यासंदर्भात बावनकुळे यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’विधानपरिषद सदस्य म्हणून आज विधानभवनात शपथ घेतली. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शपथ दिली. यावेळी संसदीय मंत्री अनिल परब , मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील आणि विधानपरिषदेतील मान्यवर ज्येष्ठ सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’लोकसेवेसाठी माझे आयुष्य समर्पित आहे. मला पुन्हा एकदा सेवेची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचे मी मनापासून आभार मानतो’, असे बावनकुळे म्हणाले आहेत

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..