राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार होमक्वारंटाईन ; सुळे कुटुंबियांना कोरोना झाल्याने खबरदारी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोना झाला आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही होमक्वारंटाईन करण्यात आले आहे.
सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही; पण संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून शरद पवार यांनाही होमक्वारंटाईन केले आहे. शरद पवार यांनी एका पुस्तक प्रकाशन समारंभाला नुकतीच हजेरी लावली होती. त्यानंतरच सुप्रिया सुळे यांच्या कोरोनाशी संबंधित ट्विट आल्याने आता शरद पवार खबरदारीचा उपाय म्हणून होमक्वारंटाईन करण्यात आले असल्याचे कळते.
हिवाळी अधिवेशनावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह एका आमदाराला कोरोना झाला. तसेच विधान भवनात ५० कर्मचार्यांना, पोलिसांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यंदाचे हिवाळी अधिवेशन कोरोना रुग्णसंख्या वाढवण्यास कारणीभूत ठरल्याची भीती व्यक्त होत आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..