मुख्यमंत्री उद्धव ठाकरेनी बोलावली टास्कफोर्सची बैठक…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात काल दिवसभरात सुमारे ४,००० नव्या रुग्णांची नोंद झाल्याने चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (गुरुवार) कोविड टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे.
या बैठकीत निर्बंध अधिक कडक करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
कालच थर्टीफर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमांवर निर्बंध आणणारी नवी नियमावली राज्य शासनानं जाहीर केली होती. दरम्यान, राज्यात काल दिवसभरात सुमारे ४,००० नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ८५ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळं वर्षाच्या शेवटच्या दिवशी आणि नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन संसर्गाचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापार्श्वभूमीवर महत्वाची चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्कफोर्सची बैठक बोलावली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….