महागाव नगरपंचायत निवडणूकीत सरासरी ८१ टक्के मतदान ; ५१ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद # पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात एसआरपीएफ मदतीला ; “येतो झाकी है , चार ओर बाकी है”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६७७७
महागाव :
नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान सुरळित पार पडली .महागाव नगरपंचायत निडणुकीत सरासरी ८१ टक्के मतदान झाले असून १३ जागांसाठी ५६ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत सीलबंद करण्यात आले..बचत भवन येथील मतदान केंद्राबाहेर दोन गट समोरासमोर आल्याने “फ्री – स्टाईल ” हाणामारी झाली.त्यामुळे महागाव पोलिसांच्या मदतीला एसआरपीएफ जवानांची एक तुकडी तैनात करण्यात आल्याने दोन गटातील वाद संपुष्टात आला. तर बचत भवन या मतदान केंद्रांवरील वाद वगळता इतर मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया अतिशय शांत पणे पार पडली. आगामी एकूण चार प्रभागासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी अनेकांनी येतो झाकी है ओर चार बाकी है म्हणत गुडघ्याला बाशिंग बांधले आहेत.
महागाव नगरपंचायत च्या १७ पैकी १३ जागांसाठी सार्वत्रिक निवडणुकीत मतदान प्रक्रियेला सकाळ पासून सुरवात झाली.मतदारांनी स्वयंफुर्तीने मतदानाला सकारात्मक प्रतिसाद दिला.यामध्ये प्रभाग क्रमांक १ च्या सावित्रीबाई फुले मतदान केंद्रावर ३१८ पैकी २५२ (७९.२४ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला .प्रभाग ४ मध्ये ३३५ पैकी २२८ (६८.०५ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
प्रभाग ५ च्या मतदान केंद्रावर ४१९ पैकी ३०८ (७३.५० टक्के) इतके मतदान झाले .
प्रभाग ६ करिता ४३२ पैकी ३७२(८६.११टक्के) मतदान झाले.
प्रभाग क्रमांक ८ च्या चुरशीच्या लढतीत मतदान केंद्रावर ४४९ पैकी ३८८ (८६.४१ टक्के) मतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी समोर आले.
प्रभाग ९ मध्ये ४०५ पैकी ३५५ (७८.६५ टक्के) मतदान झाले.प्रभाग १० मध्ये ४२१ पैकी ३१३ (७४.३४ टक्के)मतदान झाले.प्रभाग १२ मध्ये ४५२ पैकी ४०० (८८.४९टक्के)मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
प्रभाग १३ करिता ३०१ पैकी २३० ( ७६.४१ टक्के)मतदार मतदान करण्यासाठी आले.
प्रभाग १४ मध्ये ५२६ पैकी ४०४ (७६.८० टक्के) मतदारांनी मतदान केले.
प्रभाग १५ मध्ये ३८८ पैकी ३०६ (७८.८६ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.टॉप थ्री लढतीत असलेल्या प्रभाग १६ मध्ये सर्वाधिक ४७३ पैकी ४२५ (८९.८५टक्के) मतदारांनी आपल्या पसंती उमेदवाराला मतदान केले.शहरातील मतदार संख्येच्या तुलनेत सर्वात मोठा प्रभाग म्हणून ओळख असलेल्या प्रभाग १७ च्या मतदान केंद्रावर ६७२ पैकी ५७२(८५.११ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.