महाराष्ट्राला हुडहुडी ; थंडीचा कडाका वाढला ; अनेक जिल्ह्यात 10 अंशांपेक्षा कमी तापमान ; विदर्भात सर्वात कमी तापमान….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- उत्तरेकडील राज्यांत आलेल्या थंडीच परिणाम महाराष्ट्रातही जाणवत असून, राज्यातील बहुतांश भागात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. परिणामी राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे.
राज्यात सोमवारी नागपूर येथे सर्वात नीचांकी म्हणजेच 7.8 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुढील आठवडाभर राज्यात थंडीचा कडाका कायम राहील असा अंदाज आहे.
पंजाब, हरियाणा, चंढीगड तसेच गुजरात आणि राजस्थानातील काही भागांमध्ये थंडीची लाट आली आहे. या लाटेचा प्रभाव महाराष्ट्रावरही दिसून येत आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे. पुढील आठवडाभर राज्यात आकाश निरभ्र राहून तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
10 अंशांपेक्षा कमी तापमानाचे जिल्हे
नागपूर 7.8
अमरावती – 8.0
गोंदिया – 8.2
जळगाव – 8.7
वर्धा – 9.0
ब्रह्मपुरी – 10
नगर – 10.1
बुलढाणा – 10.5
औरंगाबाद -10.6

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….