चांदीवाल आयोगाकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ५० हजारांचा दंड….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागील अडचणी काही केल्या संपताना दिसत नाही.कारण देशमुख यांच्याविरुद्ध वसुलीच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगाने आता त्यांना ५० हजार रुपयांचा दंड ठोठवला आहे.
चांदीवाल आयोगाकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सचिन वाझेच्या बद्दल क्रॉस एक्झामिनेशनसाठी वकिलाच्या अनुपस्थितीमुळे हा दंड ठोठवला गेला आहे. हा दंड मुख्यमंत्री मदत निधीत जमा केला जाणार आहे.
या अगोदर सप्टेंबर महिन्यात वसुलीचा आरोप करणाऱ्या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात ५०,००० रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.
परमबीर सिंग हे आयोगासमोर उपस्थित राहत नाही त्यामुळे सुनावणी पुढे ढकलावी लागत आहे. म्हणून त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले जावे असे आयोगाचे वकील शिशिर हिरे यांनी म्हटले होते. यावर आयोगाने परमबीर सिंग यांना ५०,००० रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले होते.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मार्चमध्ये या आयोगाची स्थापना केलेली आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रीय ताकद तेजस्वी यादव यांच्यामागे..!
आता महाराष्ट्रात मोठा राजकीय धमाका होणार…!