राज्यातील 12 आमदारांचा निलंबन प्रकरणाची सुनावणी मंगळवारी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- राज्यातील बारा आमदारांच्या निलंबन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आता मंगळवारी सुनावणी होणार आहे.
भाजपच्या १२ आमदारांना विधानसभेत गोंधळ आणि गैरवर्तन केल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे.या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आज होती.
मात्र खानविलकर आणि सी. टी. तिवारी यांच्या खंडपीठापुढील सर्व सुनावण्या तहकूब करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा सुनावणी आता मंगळवारी होणार आहे, अशी माहिती भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी दिली. या सुनावणीसाठी आशिष शेलार दिल्लीत आले आहेत.
पावसाळी अधिवेशन सुरु असताना विरोधी पक्ष भाजपच्या सदस्यांनी विधानसभेत गोंधळ घातला होता. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. विधानसभा कामकाजाच्या पहिल्या दिवशी भाजपकडून सभागृहात गोंधळ घालण्यात आला होता. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाली असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर निलंबनाची कारवाई भाजप नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..