ओबीसी आरक्षणाला स्थगिती : दिलं के आरमा आसुओं मे बहे गये ; १७ जागांसाठी ८५ नामांकन दाखल
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६७७७
महागाव :
२१ डिसेंबरला होणाऱ्या महागाव नगरपंचायत निवडणुकीत प्रभागनिहाय आरक्षणात नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आरक्षणाला सर्वाच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे.तत्पूर्वी सर्वाच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील संभाव्य उमेदवारांत मोठी शंका निर्माण झाली होती.मात्र राज्य निवडणूक आयोगाने सर्वाच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आरक्षित असलेल्या प्रभागातील निवडणूक स्थगित करण्याचे परिपत्रक जारी केले आहे. अखेरच्या दिवशी निवडणूक आयोगाचे पत्र प्राप्त झाल्यानंतर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग मधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवारांचे नामांकन स्वीकारणात आले नाही.त्या कारणास्तव उमेदवारांची मोठी पंचायत निर्माण झाली. ज्यांनी निवडणूक लढण्याची स्वप्न रंगविले त्यांची “दिलं के आरमा आसुओं मे बहे गये” गत झाल्याचे चित्र तहसील कार्यालयात पहावयास मिळाले.
महागाव नगरपंचायत मधील १७ पैकी ४ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणून आरक्षित होत्या.त्यापैकी प्रभाग क्रमांक २,३,७,आणि ११ या प्रभागाचा समावेश होता.मात्र ओबीसी आरक्षणाच्या स्थगिती नंतर या प्रभागातील संभाव्य उमेदवारांचे नामांकन अर्ज स्वीकारण्यात आले नाही.त्यामुळे आता हे प्रभाग निवडणुकी पासून वंचित राहणार आहेत.न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरण्यास १ डिसेंबर पासून सुरवात झाली.त्यांनतर जवळपास नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आरक्षित ठिकाणी प्रभाग २,३ आणि ११ करिता प्रत्येकी एक नामांकन दाखल झाले.त्यांनतर
अखेरच्या दिवशी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशापूर्वी प्रभाग २ करिता दोन, प्रभाग ३ करिता तीन, प्रभाग ८ करिता सात आणि प्रभाग ११ करिता एक नामांकन अर्ज प्राप्त झाले.मात्र दुपारच्या सुमारास राज्य निवडणूक आयोगाचे ओबीसी आरक्षणाला सर्वाच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्थगिती दिल्याने नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व्यतिरिक्त निवडणूक प्रक्रिया सुरळीत ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याने दुपार नंतर ओबीसी प्रभागातील नामांकन स्वीकारण्यात आले नाही.त्यामुळे अनेक संभाव्य उमेदवार नाराज झाल्याचे दिसत होते.अखेरच्या दिवशी नामांकन अर्ज स्विकारण्याची वेळेत बदल करून वाढीव वेळ देण्यात आला. नामांकन दाखल करण्याच्या सुरवातीपासून अखेरच्या दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रभाग १ मधून एकूण ५ नामांकन दाखल झाले आहेत , प्रभाग ४ करिता तीन, प्रभाग ५ करिता पाच,
प्रभाग ६ साठी आठ ,प्रभाग ८ करिता आठ,प्रभाग ९ करिता चार,प्रभाग १० साठी चार,
प्रभाग १२ करिता नऊ,प्रभाग १३ करिता पाच ,प्रभाग १४ मध्ये सहा,प्रभाग १५ करिता सहा,प्रभाग १६ साठी केवळ दोन तर प्रभाग १७ साठी अखेरच्या दिवसापर्यंत ९ नामांकन अर्ज प्राप्त झाले आहेत.