विधानसभा अध्यक्ष पद कोणाला मिळणार ; “या” तीन नावाची जोरदार चर्चा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा (Speaker of the Legislative Assembly) राजीनामा दिल्यापासून महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांची निवड करण्यात आली नाही.
तसेच यापुर्वी हंगामी अध्यक्ष बसवून महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन पार पडलं. त्यात मोठा गोँधळ निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. पण आगामी अधिवेशनात आता अध्यक्ष असणार का?, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात होता.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसेचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीचा दौरा केला होता. त्यावेळी विधानसभेच्या अध्यक्षपदासाठीचं नाव निश्चित होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. अशातच आता काँग्रेसमधून विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी तीन नावं पुढं येताना दिसत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचं नाव चर्चेत आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह भोरचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) आणि मुंबईचे आमदार अमिन पटेल (Amin Patel) यांचं नाव देखील चर्चेत आहे. मागील विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान संग्राम थोपटे यांचं नाव चर्चेत होतं. मात्र, त्यांच्या नावावर संमती झाली नव्हती. अशातच आता नाना पटोले यांनी दिल्लीत दौऱ्यावर अध्यक्षपदासाठीचं नाव निश्चित केल्याची देखील चर्चा आहे.
दरम्यान, थोपटे हे वाघासारखे असून त्यांनी अडकून न राहत कायम मैदानात राहावे, अशी आपली इच्छा असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता संग्राम थोपटे यांची वर्णी लागणार का? असा सवाल आता उपस्थित होता

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….