फुलसावंगी जिल्हा परिषद विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन अध्यक्षपदी सौ. रेवती पांढरे यांची बिनविरोध निवड…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :९६३७८८६७७७
विद्यार्थी संख्येने सर्वात मोठी असलेली फुसावंगी जिल्हा
परिषद माध्यमिक विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा मा.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विवेक पांढरे यांची पत्नी सौ.रेवती विवेक पांढरे यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी माधव घोडे यांची निवड करण्यात आली.तसेच शिक्षण तज्ञ म्हणून येथील सामाजिक कार्यकर्ते शैलेश वानखेडे यांची निवड करण्यात आली.
कुठल्याही प्रकारचा राजकीय हेतू न बाळगता फुलसावंगी या गावामध्ये शालेय व्यवस्थापन समितीची निवड ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झाली आहे.शाळेचे माजी अध्यक्ष विवेक पांढरे यांनी त्यांच्या कार्यकाळात शाळा सुधारणेसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले.त्याचीच पावती म्हणून त्यांच्या पत्नी सौ.रेवती पांढरे यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध झाल्याचे त्यांच्या निवडीवरून दिसून येते. यावेळी सदस्य म्हणून सिमा कि.खंदारे, राजु भा. मोरे, सुवर्णा वि.इटेवाड, ज्योती स. पेंटेवाड, रमेश ना. पाचंगे, गजानन सु. कृष्णापुरे, गजानन शा. आठाव यांची निवड करण्यात झाली.