शाळा 1 डिसेंबर पासून सुरू ; सरकारने जाहीर केली नवीन नियमावली….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- दक्षिण आफ्रिकेतुन जगभर पसरलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरीऍंट ओमिक्रॉनमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या अनुषंगाने प्रशासनाला सुचनाही केल्या आहेत.
मात्र राज्यातील शाळा या मात्र सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण शाळा सुरु करताना काय खबरदारी घ्यावी यासाठी सविस्तर नियमावली देण्यात आलीय.
सध्या राज्यातील ग्रामीण भागांत पाचवी ते बारावी आणि शहरी भागांत आठवी ते बारावीच्या शाळा सुरू आहेत. आता १ डिसेंबरपासून पहिलीपासूनचे सर्व वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला होता.
काय आहेत शासनाचे नियम
राज्य शासनाने जाहीर केले असले तरी काय खबरदारी घ्यावी याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
शाळेत तीन ते चार तासांपर्यंतच शिकविले जावे.
जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये घ्यावी
विद्यार्थ्यांचे तोंड मास्क ने पूर्णपणे बांधलेले असावे
विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तत्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी, विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत.
सर्व शिक्षकांची कोविड19 साठीची 48 तासांपूर्वीची RTPCR चाचणी असावी
या काळात शाळेत कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम, संमेलन तसेच खेळाचे आोयजन होणार नाही.
शाळेत विलगीकरणाची सुविधा असायला हवी.
शाळेच्या प्रशासनाने स्थानिक आरोग्य विभागाच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे.