विरोधी पक्षाच्या 20 खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडणार मोदी सरकार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकार नवीन कृषी कायदे मागे घेण्यासंदर्भातील विधेयक मांडणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विधेयक आधी लोकसभेत मांडण्यात येणार आहे, यानंतर राज्यसभेत हे विधेयक मांडण्यात येणार आहे.
हे महत्वाचे विधेयक असल्याने भाजप आणि काँग्रेसने आपल्या खासदारांना संसदेत उपस्थित राहण्याठी व्हीप जारी केले आहे.
हे विधेयक मागे घेत असताना संसदेत गदारोळ होण्याचे चिन्ह आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जरी नवीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली असली, तरी दिल्लीच्या सिंघू सीमेवर आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांनी जोपर्यंत ‘एमएसपी’बाबत कायदा होत नाही, तोवर आंदोलन संपणार नसल्याचे सांगितले आहे. आता हाच मुद्दा विरोधी पक्ष उपस्थित करून एमएसपीसाठी कायदा करावा ही मागणी करत मोदी सरकारला धारेवर धरू शकतात.
20 खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडणार केंद्र सरकार
टीव्ही न्यूजचैनल च्या प्रतिनिधीला दिलेल्या वृत्तानुसार, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गदारोळ माजविणाऱ्या 20 खासदारांच्या निलंबनासाठी केंद्र सरकार या अधिवेशनात प्रस्ताव मांडू शकते. या खासदारांमध्ये काँग्रेसचे सय्यद नासिर हुसेन, रिपुल बोरा, प्रताप सिंग बजावा, फुले देवी नेताम, छाया वर्मा, अशिलेश प्रसाद सिंग, दीपेंद्र हुडा आणि राजमनी पटेल यांचा समावेश आहे. तर यात टीएमसी खासदार डोला सेन, शांता छेत्री, मौसम नूर, अबीर रंजन बिसवास आणि अर्पता घोष यांचा समावेश आहे. यासोबतच शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी आणि अनिल देसाई आणि लेफ्ट पक्षकाडून एलमराम करीम आणि आपचे संजय सिंह यांचीही नावे आहेत.
दरम्यान, संसदेचे हे अधिवेशन आजपासून सुरू होत असून ते 23 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. महिनाभर चालणाऱ्या या हिवाळी अधिवेशनात सरकार 26 विधेयके मांडणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ट्विट करून सर्व पक्षांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….