कोविड लसिकरणात अपेक्षित गती राखा :- विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्या सूचना…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 25 नोव्हेंबर :- जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांचे कोविड लसिकरण पुर्ण करण्यासाठी जिल्हा यंत्रणेने अपेक्षीत गती राखावी व पुढील महिण्याच्या 10 तारखेपर्यंत पहिल्या डोजचे काम पुर्ण करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आज विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी कोरोना लसिकरणाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र गवार्ले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण, जिल्हा लसिकरण अधिकारी डॉ. सुहास कोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रमा बाजोरिया प्रामुख्याने उपस्थित होते.
आयुक्त पियुष सिंह पुढे म्हणाले की, पाहिला डोज घेतल्यावर दुसऱ्या डोजसाठी पात्र ठरणाऱ्या व पात्र झाल्यावरही अद्याप दुसरा डोज न घेतलेल्या नागरिकांचे लसिकरण पुर्ण करण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. कोरोना टेस्टींगची संख्या वाढवावी, घरोघरी लसिकरणाची टिम पाठवावी तसेच विविध माध्यमांतून जनजागृतीद्वारे नागरिकांना लसिकरण करून घेण्याचे आवाहन करावे, अशा सूचनाही आयुक्त पियुष सिंह यांनी दिल्या. यावेळी त्यांनी महसुल यंत्रणेशी संबंधीत विविध विषयांचा आढावा घेतला.
बैठकीला महसूल व आरोग्य विभागाचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.