यंदा राज्य शासनाचे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- यंदा राज्य शासनाचे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब झाले असून दि. 22 ते 28 डिसेंबर या कालावधीत अधिवेशन प्रस्तावित आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते अजूनही रुग्णालयातच उपचार घेत आहेत. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला ते ऑनलाईन उपस्थित होते.
हिवाळी अधिवेशनास संदर्भात संसदीय कामकाज समीतीची सोमवारी बैठक होणार आहे. त्यात अधिवेशनाची तारीख अंतिम केली जाईल. गेल्या वर्षी देखील नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्यात आले होते.
करोनाची येऊ घातलेली संभाव्य तिसरी लाट, विधान परिषद निवडणूक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया या तीन कारणास्तव राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर पडले आहे. दरम्यान आता 22 ते 28 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
यंदाचे हिवाळी अधिवेशन करोना पार्श्वभूमीवर होत आहे. त्यामुळे त्यात सहभागी होणाऱ्या विधिमंडळ सदस्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यत लसीकरणाचे दोन डोस पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला आपल्यासोबत दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणणे आवश्यक आहे. विधिमंडळ परिसरात सभागृह सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश दिला जाणार नाही.
दरम्यान, हिवाळी अधिवेशन हे प्रथा आणि परंपरेनुसार दरवर्षी नागपूरला होते. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर झालेल्या शस्त्रक्रियेच्या कारणास्तव ते मुंबईत घेण्याचे नियोजन आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीलाही अधिवेशन मुंबईत हवे आहे, पण भाजप हिवाळी अधिवेशन नागपुरात व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….