महागाव पोलिस स्टेशन मध्ये दोन अधिकाऱ्यांत झाली चांगलीच शाब्दिक खडाजंगी ; तपास कामी आलेले हदगाव पोलिस, बँकेचे अधिकारी निमूटपणे गेले निघून
रितेश पुरोहित
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :-
50 लाख रुपये किमतीचा सोयाबीन घोटाळा महागाव तालुक्यात चांगलाच गाजत आहे. मोठ्या गुन्ह्याच्या तपासातील संधी घर चालून आलेली असताना महागाव पोलिसांनी बाजार समितीच्या पत्रानंतर माल जप्ती करण्यापलीकडे ठोस कार्यवाही केलेली नाही. अखेर याच प्रकरणात हादगाव पोलिसांनी एक कोटी 91 लाख रुपये किमतीच्या मालाची अफरातफर झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
प्रथम खबरी अपराध क्रमांक 0302/ 2021 हदगाव पोलीस स्टेशन दाखल गुन्ह्यांमध्ये तपास कामी हदगाव पोलिस स्टेशनचे अधिकारी व बँकेचे अधिकारी शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान महागाव पोलीस स्टेशन मध्ये आलेले असताना त्यांच्यासमोरच महागाव पोलिस स्टेशनच्या दोन अधिकाऱ्यांमध्ये याच प्रकरणावरून चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली. दोघांनीही एकमेकाला शिविगाळीकरित अशलील शब्दांची लाखोळी वाहिल्यामुळे उपस्थित असलेले नागरिक व हदगाव चे पोलीस अधिकारी यांनी दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये मध्यस्थी केली. हा सारा प्रकार पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झालेला आहे.
दोन्ही अधिकाऱ्यांचा एकमेकाविषयी अनावर झालेला राग पाहू जाता एकमेकाविषयी काहीतरी गैरसमज मधून हा प्रकार घडला असावा अशी चर्चा सुरू झाली आहे. दोन अधिकाऱ्यांमधील हा वाद लागलीच वरिष्ठ पोलीस अधिकारी पर्यंत पोहोचलेला आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असून जिल्हा पोलीस अधीक्षक नेमकी कोणती कार्यवाही करतात याकडे पोलिस अधिकारी कर्मचाऱ्याच व नागरिकांचे लक्ष लागले आहे तसेच स्थानिक गोडाउन मधुन सुधा शेतकऱ्यांचा शेतमाल गायब आहे याबाबत शेतकरी महिलेने तकरार दिली परंतु निष्क्रियतेचा कळस गठलेल्या महगाव पोलिसांनी तकरार दाखल करुण घेतली नाही त्यामुळे पोलिसांना केवल हप्ते वसुलीचेच काम राहिले आहे कायदा सुव्यस्तता धाब्यावर बसउन अवैध धंदे जोरात सुरु आहेत याला आवर घालन्याची मागणी होत आहे.