कोरोना नियंत्रण नियमांची जवाबदारी व्यापाऱ्यासह ग्राहकांची :- जगदीश नरवाडे…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :-
तालुक्यातील व महागाव शहरातील सर्व छोटे-मोठे व्यापारी/ व्यवसायिक यांनी कोविंड १९ नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी सर्व व्यावसायिकांना केले आहे.सोबतच कोरोना नियंत्रणात आणण्याची जवाबदारी व्यापाऱ्यास ग्राहकांची सुध्दा असल्याचे सांगितले.त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करावे अशी विनंती व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी केली आहे. दिवाळीचा सण अगदी तोंडावर असल्याने मार्केटमध्ये व दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात बाहेरून ग्राहक येत आहेत. दिवाळीच्या या घाई गडबडी मध्ये बाहेरील जिल्ह्यातून दिवाळीसाठी आपल्या गावाकडे परत येत असलेला नागरिक यांच्यापासून कोरोना रोगांचा प्रसार होण्याची दाट शक्यता असते.त्यामुळे व्यापारी बांधवांनी काळजी घेण्याची नितांत आवश्यकता आहे. आपल्या कुटुंबाची सुरक्षा करण्यासाठी नियमाचे काटेकोर पालन करायला हवे.
शहरातील व तालुक्यातील काही व्यापाऱ्यांकडून नियमांचे पालन होत आहे . अपवाद वगळता व्यापारी नियमांचे पालन करताना दिसत नाही. त्यामुळे व्यापारी आणि ग्राहकांनी आपल्या तोंडाला मास्क लावणे, सॅनिटाजर चा वापर करणे, सुरक्षित अंतर ठेवून ग्राहकांशी संवाद करावा, व ग्राहकाच्या तोंडाला मास्क लावण्याचे सांगणे या व इतर कोरोना संबंधित सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगदीश भाऊ नरवाडे यांनी सर्व व्यवसायिक बांधवांना प्रसिद्ध पत्रकातून विनंती केली आहे.
कोरोना लस घेवून कोरोना हद्दपार करा :
कोरोना नियंत्रणात आला असला तरी त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोरोना लस घेणे बंधनकारक आहे.व्यापारी आणि ग्राहकांनी कोरोना लस घेवून कोरोना हद्दपार करा .

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….