हनीट्रॅप मधील मास्टरमाईंड संदेश मानकरची आत्महत्या…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विशेष प्रतिनिधी
यवतमाळ :
हनीट्रॅप प्रकरणात दिल्ली येथील नामांकित डॉक्टरला २ कोटी रुपयांनी चुना घालणार्या कुख्यात “गर्ल व्हॉईस मॅन तथा मास्टरमाइंड आरोपी तरुणाने प्लास्टिकच्या पिशव्या डोक्यात घालून व त्यात सिलेंडरमधील गॅस आत सोडून आत्महत्या केली.
ही घटना गुरुवार, 21 ऑक्टोबरला रात्री दारव्हा मार्गावरील जसराणा अपार्टमेंट येथे उघडकीस आली.
संदेश अनिल मानकर (वय २२, रा. यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. गेल्या महिन्यापूर्वी सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्लीच्या डॉक्टरला चक्क २ कोटिने गंडा घातल्याप्रकरणी संदेशला अटक केली होती. तसेच त्याच्याकडून १कोटी ७४ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. दरम्यान कारागृहात असलेला संदेश नुकताच कारागृहातून बाहेर आला होता. तेव्हापासून दारव्हा मार्गावरील जसराणा अपार्टमेंटमध्ये त्याच्या एका महिला नातेवाइकाकडे राहायचा.
दरम्यान आज त्याची नातेवाईक महिला वर्धेला गेल्याने अपार्टमेंटमधील घरी कुणीही नव्हते. नेमकी हीच संधी साधून त्याने काळ्या प्लॅस्टिकच्या पन्न्या डोक्यात घातल्या. सिलिंडरमधील गॅस आतमध्ये सोडला. यातच गुदमरून त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलिसांसह अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेने पोलिस वर्तुळातही खळबळ उडाली आहे