पैगंबर जयंती निमित्त मिळालेल्या दिव्य कुरआनच्या अमूल्य भेटीमुळे प्रतीक्षा झाली तृप्त…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुरुषोत्तम कुडवे : ९३७०४६४८२४
दिग्रस :-
दिग्रस येथील युवा पत्रकार व सामाजिक चळवळीत नेहमी अग्रेसर राहणारे लक्ष्मण टेकाळे यांना ” दिव्य कुरआन ” हा ईश्वरीय ग्रंथ नुकतेच भेट मिळाल्यामुळे जणू आपली अनेक वर्षांची तहान नाहीशी होऊन आत्मा तृप्त झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली त्वरित पुसद येथील ऍड सादिक यांनी अवघ्या दहा मिनिटात हा पवित्र ग्रंथ भेट देण्यात आला
” दिव्य कुरान ” हा फक्त मुस्लिमांचाच व मुस्लिमांसाठीचा नसून जगातील समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी अवतरित करण्यात आलेला एक अमूल्य मार्गदर्शक ग्रंथ आहे . म्हणूनच लक्ष्मण टेकाळे यानी असंख्य मुस्लिम बांधवांना दिव्य कुरानची प्रत वाचण्याकरिता मागितली . मात्र मराठी आवृत्ती उपलब्ध नसल्यामुळे मागील वर्षभरापासून त्यांना सदर ग्रंथ मिळू शकला नव्हता . यामुळे त्यांची जिज्ञासा अधीकच वाढत गेली .
सर्वत्र पैगंबर जयंतीची लगबग सुरू असून मात्र सुदैवाने आज { ता. १०} त्यांच्या स्टेट बँकेसमोरील दुकानावर ऍड सादिक यांनी पवित्र “कुराण” भेट दिली . त्यांनी दिव्य कुरआनबद्दल थोडक्यात माहिती दिली असता त्यांनी “दिव्य कुराण” हा पवित्र ग्रंथ वाचण्यासाठी मागून सुद्धा उपलब्ध झाला नसल्याने तो ग्रंथ मराठी आवृत्ती मध्ये मिळावा अशी इच्छा प्रकट केली . त्यांनी दिव्य कुरआनची मराठी आवृत्ती अवघ्या दहा मिनिटातच उपलब्ध करून सन्मानपूर्वक भेट दिली . यावेळी अरुण वाझाळकर देखील उपस्थित होते .
सदर अमूल्य भेटीमुळे जणू माझी अनेक वर्षांच्या “कुरान” पवित्र ग्रंथ असून सर्वच माणसांसाठी असल्याने बरेच वर्षांपासूनची प्रतीक्षा तृप्त झाल्याची प्रतिक्रिया लक्ष्मण टेकाळे यांनी व्यक्त केली .