मोठी बातमी बस चालकाचा निष्काकाळजीपणा अंगलट ; बस नाल्यात कोसळली ; बचाव कार्य प्रगतीपथावर
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
पुसद-उमरखेड रस्त्यावरील दहागाव पुलावरून पाणी वाहत असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने बस पुलावरून नाल्यात कोसळली. यात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून बस चालकासह काही प्रवासी बेपत्ता असल्याचे वृत्त समोर आले आहे. मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता ही घटना घडली.
मागील दोन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. नदी, नाले ओसंडून वाहत आहेत.
अशातच मंगळवारी सकाळी नागपूर आगाराची एमएच १४ बी.टी.५०१८ या क्रमांकाची बस उमरखेड येथून काही प्रवासी घेऊन नागपूरकडे निघाली होती.
याच मार्गावर दहेगाव नाला असून त्यावर मोठा पूल आहे. दोन दिवसांपासून या पुलावरून पाणी वाहत आहे. असे असताना बस चालकाने नाल्यावरून बस काढण्याचा प्रयत्न केला. परिसरात असलेल्या नागरिकांनी बसला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने दुर्लक्ष केल्याने बस चालकाचा निष्काळजीपणा अंगलट आला आहे.या पुलावरून मागील वर्षी एक दुचाकी सुध्दा वाहून गेली होती.अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.