हिंगोलीत नवीन सोयाबीनला तब्बल ११ हजार २१ रुपयाचा भाव
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद
हिंगोली शहरातील जुन्या मोंढ्यात नवीन सोयाबीन खरेदीला गुरुवारपासून सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी ५ क्विंटल सोयाबीनची खरेदी करत, ११ हजार २१ रुपये भाव मिळाला असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी दिली.आधी पेर केलेल्या सोयाबीनची काढणी अनेक शेतकऱ्यांनी सुरू केली असून मोंढ्यात आणणे सुरू केले आहे. ९ सप्टेंबर रोजी एकंबा येेथील शेतकरी गजानन लक्ष्मण वसू यांनी ५ क्विंटल सोयाबीन मोंढ्यात आणले होते. हे सोयाबीन शिवा-पार्वती इंडस्ट्रीज यांनी खरेदी केले आहे. नवीन सोयाबीन व्यंकटेश ट्रेडिंगमध्ये आणले होते. सोयाबीनला बोलीअंती ११ हजार २१ रुपये भाव शिवा-पावर्वती इंड्रस्टीजने दिला.प्रारंभी नवीन सोयाबीनची विधिवतपणे शेतकऱ्याच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी ज्ञानेश्वर मामडे, विक्री अग्रवाल, पवन मुंदडा, विशाल दोडल, मुरली पांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी आदी उपस्थित होते.