पालक गमावलेल्या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी प्रयत्न करावे ; बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कृती दल समिती आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांच्या सूचना…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 24 ऑगस्ट :- कोविडमुळे निराधार झालेल्या 397 बालकांसोबतच कोविड व्यरिरिक्त अनाथ व निराधार झालेल्या इतर 14 हजार 466 बालकांना देखील शासनाच्या विविध योजनांचा लाभ देवून शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावे व त्यांना आवश्यक असणारे जात प्रमाणपत्र, नॅशनलीटी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, नॉनक्रीमीलेअर, आधार, राशनकाई इत्यादी विविध कागदपत्रे मिशनमोडवर उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज जिल्हा कृती दलाला दिल्या.
बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कृती दल समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आज घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू, जिल्हा शल्यचिकित्सक तरंगतुषार वारे, जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, कौशल्य विकासच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रमोद सुर्यवंशी, चाईल्ड लाईनचे दिलीप दाभोडकर, इ. प्रामुख्याने उपस्थित होते.
कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना पतीचे नावे असलेली घर, शेत-जमीन व इतर स्थावर मालमत्ता हस्तांतरीत करण्यासाठी कायदेविषयक विधी सल्ला गरजेप्रमाणे उपलब्ध करून द्यावा तसेच 18 वर्षावरील बालकांना कौशल्य विकासच्या योजनामधून विविध प्रशिक्षण देवून स्वत:च्या पायावर उभे राहण्यास सक्षम करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी येडगे यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी कोविडमुळे अनाथ व निराधार झालेल्या बालक, कोविडमुळे विधवा झालेल्या महिला, कोविड व्यतिरिक्त अनाथ व निराधार झालेले बालक तसेच कुमारी माता यांच्या प्रकरणांचा आढावा घेवून यंत्रणेला आवश्यक दिशानिर्देश दिले.
बैठकीला वैद्यकीय अधिकारी डॉ. रमा बाजोरीया, साथरोग अधिकारी डॉ. पी.ए.शेख, नगरपरिषद बांधकाम विभागाचे के.बी.वर्मा, बालविकास अधिकारी देवेंद्र राजुरकर तसेच संबंधीत अधिकारी उपस्थित होते.