ग्रामपंचायत हिवरा च्या वतीने कोव्हीड योध्दा गौरव समारंभ संपन्न
अनिल बोम्पीलवार
पॉलिटिक्स स्पेशल प्रतिनिधी
हिवरा संगम(महागाव):
गेल्या दीड वर्षापासून सतत कोरोणा संसर्ग वाढत असताना त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाच्या विविध विभागांनी उत्कृष्ट कार्य केले. आज दिनांक 30 जून ला माजी मंत्री व आमदार संजय राठोड व परिवर्तन पॅनल प्रमुख तसेच शिवसेना विभाग प्रमुख राजूभाऊ धोतरकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत हिवरा च्या वतीने शासनाचे कोरोना नियम पाळून कोवीड योद्धा सत्कार समारंभ पार पडला. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विलास भुसारे यांच्या अध्यक्षतेखाली , तहसीलदार ईसाळकर, गटविकास अधिकारी अंदेलवाड, अभियंता चव्हाण , एकलवाड, सरपंचा सौ. मेघाताई बोरूळकर,उपसरपंच
शरद पाटील, ज्येष्ठ पत्रकार विजयराव बोम्पीलवार ,महागाव तालुका शिवसेना प्रमुख प्रमोद भरवाडे ,माजी तालुकाप्रमुख रवींद्र भारती यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी कोरोणा काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या, तहसीलदार, पोलीस अधिकारी व कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्राम विकास अधिकारी, कोतवाल, आरोग्य विभागातील डॉक्टर्स परिचारिका रुग्णवाहिकेचे चालक ,आशा वर्कर, पोलीस पाटील, पत्रकार बांधव ,ग्रामपंचायत कर्मचारी यांचा, कोवीड योद्धा म्हणून , ग्रामपंचायत हिवरा च्या वतीने शाल-श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच. ई. एस. हायस्कूल चे मुख्याध्यापक मुकुंद पांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य राजू धोतरकर यांनी केले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.

पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या ठाणेदारांवर निलंबनाची कारवाई करा ; महागाव तालुका पत्रकार संघाचा आंदोलनाचा इशारा….
राज्यात गारपिटीचा हाहाकार..! 12 जिल्ह्यांमध्ये संकट, थेट ऑरेंज अलर्ट, पुढील…
“शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, शेतमालाला हमीभाव द्या”: हर्षवर्धन सपकाळांची मागणी, सरकारवर टीका….
राष्ट्रवादीत काय चालले आहे..? अविश्वासाचे वातावरण आणि नेतृत्वाचा संघर्ष….
संकटाची परिस्थिती हीच संधी ; लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरा….
‘५० खोके’ला ५० ‘ठोसे’ने उत्तर; शिंदेसेनेला साथ देत भाजप नेत्यांचा विरोधकांना इशारा….