मोठी बातमी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक यांना अटक
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
ईडीने शनिवारी मध्यरात्री माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या दोघांना अटक केली आहे. देशमुखांवर लाच घेतल्याचे आरोप झाले असून त्या प्रकरणात झालेली ही पहिली अटक आहे. ईडीने काल देशमुख यांच्या नागपूर जीपीओ चौक येथील घरावर छापा मारला. त्यावेळी घरात देशमुख यांचा मुलगा सलिल होता. ईडीने त्यांचीही काही तास कसून चौकशी केली.
बरखास्त सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेने बार मालकांकडून ४ कोटी रुपये गोळा केला व ते सर्व पैसे देशमुख यांच्याकडे दिले, असा ईडीचा आरोप आहे.हा सर्व पैसा शेल कंपन्यांमध्ये गुंतवून नंतर देशमुख कुटुंबाशी संबंधित कंपन्यांकडे वळवण्यात आला” असे सूत्रांनी सांगितले. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी काल ईडीकडून छापेमारीची कारवाई करण्यात आली. त्याचवेळी देशमुख यांचे दोन स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांची ईडीकडून कसून चौकशी सुरु होती. एका चार कोटी रुपयांच्या प्रकरणात ही छापेमारीची कारवाई झाली होती. मुंबईतील १० बार मालकांनी अनिल देशमुख यांना तीन महिने चार कोटी रुपये दिल्याचं ईडीच्या तपासात समोर आलं आहे.
अनिल देशमुखांविरोधात आर्थिक अफरातफरीचे प्रकरण ईडीने नोंदवले आहे. या प्रकरणात मिळालेल्या नव्या माहितीच्या आधारावर ईडीने देशमुखांच्या नागपूर, मुंबईसह चार ठिकाणच्या मालमत्तांवर छापेमारीची कारवाई केली. मुंबईमध्ये ईडीचे पथक अनिल देशमुख यांचे खासगी सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांच्या निवासस्थानी सुद्धा शोध घेतला होता . बार मालकांनी देशमुखांना रोख रक्कम दिली. ते पुरावे ईडीने मिळवले असून त्या आधारावर ही कारवाई सुरु आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….