ओबीसी आरक्षण रद्द करणाऱ्या केंद्र शासनाच्या विरोधात 26 रोजी काँग्रेसचे धरणे आंदोलन…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड/माहूर (राजकीरण देशमुख) :-
सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. त्यामुळे या बाबींचा निषेध करण्यासाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दि. 26 जून रोजी सकाळी 10 वाजता येथील पावडेवाडी नाका, गणेशनगर टी पाँईटजवळील छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्या समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
ओबीसीचे राजकीय आरक्षण जाण्यामध्ये सध्याचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार जवाबदार आहे. केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात ओबीसींची आकडेवारी दिली नाही. त्यामुळे हे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. ओबीसीचे हे राजकीय आरक्षण जाणे म्हणजे तमाम ओबीसीला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा भाजपाचा घाट आहे, या सर्व बाबीचा निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण व प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी , कार्यकर्ते व नागरिकांनी मोठा सहभाग घ्यावा, असे आवाहन महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर सौ.मोहिनीताई येवनकर, उपमहापौर मसूदखान, जि.प.चे शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, समाजकल्याण सभापती ॲड.रामराव नाईक, कृषी सभापती बाळासाहेब रावणगावकर, महिला व बालकल्याण सभापती सौ.सुशीलाताई बेटमोगरेकर, स्थायी समिती सभापती स.विरेंद्रसिंघ गाडीवाले, महिला व बालकल्याण सभापती सौ.संगीता पाटील डक, उपसभापती गितांजली कापूरे, नांदेड ता.अध्यक्ष अॅड.निलेश पावडे ,शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर स्वामी, सिडको ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद कांचनगिरे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कविताताई कळसकर, शहराध्यक्षा अनुजा तेहरा, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रोहिदास जाधव, सेवादल जिल्हाध्यक्ष आनंदराव गुंडले, सेवादल शहराध्यक्ष लक्ष्मीकांत गोणे, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष गंगाधर सोंडारे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू कोंढेकर, शहराध्यक्ष डॉ.विठ्ठल पावडे, शमिम अब्दुल्ला, शंकर शिंदे,प्रवक्ते संतोष पांडागळे, मुन्तजीब,दिलीप कोटगीरे, यांनी केले आहे.