30 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरु….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 19 :-
काही दिवसांपूर्वी 18 ते 44 वयोगटातील लसीकरण बंद करण्यात आले होते परंतु आता दिनांक 19 जून पासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांकरिता निवडक 10 ठिकाणी कोविड लसीकरण सुरु करण्यात आले आहे. यात पाटिपूरा आरोग्य केंद्र यवतमाळ, ग्रामीण रुग्णालय बाभूळगाव, कळंब, दिग्रस, महागाव, उमरखेड, आर्णी, वणी आणि उपजिल्हा रुग्णालय दारवा व पुसद चा समावेश आहे. लसीची उपलब्धता व लाभार्थी ची मागणी नुसार लसीकरण केंद्रात वाढ करण्यात येईल.
या ठिकाणी लसीकरणासाठी येतानी नागरिकानी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक नाही. तसेच 45 वयोगटावरील नागरिकांचे करीता पुर्वी प्रमाणेच सुरू राहणार आहे. सद्या जिल्ह्यात 82 ठिकाणी लसीकरण सुरू असून 4900 कोवाक्सिन तर 11510 कोविशिल्ड लस उपलब्ध आहे. तरी सर्व पात्र नागरिकानी लस घेवून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.