जिल्हयात 47 कोरोनामुक्त, 12 जण पॉझेटिव्ह…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 13 जून :-
गत 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण सहापट आहे. जिल्ह्यात 12 जण पॉझेटिव्ह तर 47 जण कोरोनामुक्त झाले असून एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार रवीवारी एकूण 1645 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 12 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1633 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 471 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 130 तर गृह विलगीकरणात 341 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72554 झाली आहे. 24 तासात 47 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 70299 आहे. आतापर्यत जिल्ह्यात एकूण 1784 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 64 हजार 278 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 91 हजार 700 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.92 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.73 आहे तर मृत्युदर 2.46आहे.
पॉझेटिव्ह आलेल्या 12 जणांमध्ये 10 पुरुष आणि 2 महिला आहेत. यात दारव्हा येथील 2, घाटंजी 1, दिग्रस येथील 1, महागाव 1 , पुसद 2, राळेगाव 1, वणी येथील 1 , यवतमाळ येथील 3, तर झरीजामनी येथील एका रूग्णाचा समावेश आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2175 बेड उपलब्ध
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 104 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2175 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 44 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 533 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 47 रुग्णांसाठी उपयोगात तर 479 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 13 उपयोगात तर 1163 बेड शिल्लक आहेत.