कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी कोरोना काळात जनतेच्या सुखदुखात सहभाग घेऊन मदत करावी :- गोविंदराव पाटील नागेलीकर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर (राजकिरण देशमुख) :- जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी कोरोना काळात नांदेड जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीच्या उपयायोजनांची अंमलबजावणी करून जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत झोकून दिले त्याच प्रमाणे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या गावात, वार्डात व सर्कलमध्ये मास्क वाटप, कोविड सेंटरच्या बाहेर थांबलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांच्या भोजनाची सोय व इतर माध्यमातून जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून पुण्य मिळवावे व हे करीत असतांना कोरोना नियमनाचे पालन करून आपल्याही आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे पाटील नागेलीकर यांनी केले. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सुचनेनुसार वतीने दिवंगत पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून राज्यभर मास्क वाटप चे आयोजनाच्या तालुकास्तरीय छोटेखानी कार्यक्रमात ते अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रामचंद्र मुसळे जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सचिव नारायण श्रीमनवार, ना.जी.म.स. बँकेचे संचालक माजी नगराध्यक्ष प्राचार्य राजेंद्र केशवे, तालुका कॉंग्रेस अध्यक्ष तथा जि.प. सदस्य संजय राठोड, किशन राठोड, विश्वनाथ कदम,युवक कॉंग्रेस वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे राज्य समन्वयक डॉ. निरंजन केशवे, माजी उपनगराध्यक्ष मुनाफभाई जब्बारभाई, हनीफ अल्लाबक्ष, करिम शहा यांची उपस्थिती होती, सर्व प्रथम दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी, यांना व स्व. खा. राजीव सातव,आमदार स्व,रावसाहेब अंतापुरकर,दिवंगत माजी समाजकल्याण सभापती दत्तराम राठोड, देविदास मांजरमकर यांचे कोरोना महामारीने निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.प्रातिनिधिक स्वरूपात ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य परिचारिका श्रीमती सुंदरताई बोथिंगे यांना ग्रामीण रुग्णालयासाठी मास्क देऊन मास्क वाटप कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. तर एनएसयुआयच्या वतीने सोशल मिडीया तालुका अध्यक्ष पदी सोनू राठोड आसोलीकर यांची निवड करून जिल्हाध्यक्ष नागेलीकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी जि.प.सदस्य संजय राठोड, मुनाफभाई, प्राचार्य राजेंद्र केशवे, किशन राठोड,विश्वनाथ कदम,रामचंद्र मुसळे, नारायण श्रीमनवार यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले. बैठकीस जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते आनंदराव कलाने, अमोल कदम हडसनीकर, संजय आराध्ये, गोविंद आराध्ये, आकाश कांबळे, युवक काँग्रेसचे आर.डी.देशमुख, आय्यूब भाई,राजू सौंदलकर, दीपक मुरादे, नबीसाब, हनिफ भाई करीम शहा, खाजाभाई, संतोष अग्रवाल सिद्धार्थ तामगाडगे, अजीम सय्यद,सोनू राठोड, नारायण अगीरकर आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यकर्मांचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन युवक कॉंग्रेसचे विधानसभा सरचिटनिस सचिन बेहेरे यांनी केले.