फिरत्या जुगारावर महागाव पोलिसांची धाड ; रोख रकमेसह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त ; ठाणेदारांची उत्तम कामगिरी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६७७७
महागाव :
पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आमणी(बु)- पिंप्री परिसरातील एका शेतात मोठ्या प्रमाणात जुगार खेळल्या जातो. याची माहिती महागाव पोलिसांना मिळताच फिरत्या जुगारावर धाड टाकून रोख रकमेसह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कार्यवाही आज(ता.२२) दुपारीच्या सुमारास करण्यात आली आहे.
महागाव परिसरात मोठ्या प्रमाणात जुगार खेळल्या जात असल्याची गोपणीय माहिती महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास चव्हाण यांना मिळाली .हा जुगार फीरस्ती अड्डे खेळत असल्याने पोलिसांना धाड टाकण्यसाठी मोठी अडचण निर्माण झाली होती .परंतु आज आज ( ता.२२) दुपारी ठाणेदार विलास चव्हाण यांना आमणी परिसरातील शेतात डाव चालु असल्याची गोपणीय माहिती मिळताच सापळा रचून गनिमी काव्याने आपल्या पथकासह फिरत्या जुगारावर धाड टाकली. परंतु पोलीस असल्याचा जुगारांना सुगावा लागताच जुगारानी घटनास्थळावरून पोबारा केला. परंतु जुगार अड्यावरून आठ दुचाकी सह १ हजार १०० रूपये रक्कम जप्त केले आहे.पोलीस दुचाकी च्या नंबर वरून आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती ठाणेदार विलास चव्हाण यांनी “पॉलिटिक्स स्पेशल” ला बोलतांना दिली .हि कारवाई ठाणेदार विलास चव्हाण, नाराण पवार , संतोष जाधव , प्रमोद पवार , अर्जुन राठोड , गजानन मस्के , कैलास इंगळे, अक्षय घोलप यांनी कारवाई केली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….