24 तासात 355 पॉझेटिव्ह, 463 कोरोनामुक्त ; एकूण 7 मृत्यु ; जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 1361 बेड उपलब्ध…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 21 :- गत 24 तासात जिल्ह्यात 355 जण पॉझेटिव्ह तर 463 जण कोरोनामुक्त झाले असून 7 जणांचा मृत्यु झाला. यातील चार मृत्यु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, एक मृत्यु डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये तर दोन मृत्यु खाजगी रुग्णालयातील आहे.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 7231 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 355 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 6876 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3539 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1742 तर गृह विलगीकरणात 1797 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 70099 झाली आहे. 24 तासात 463 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 64874 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1687 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.35, मृत्युदर 2.41 आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 53 व 72 वर्षीय पुरुष, बाभुळगाव तालुक्यातील 53 वर्षीय पुरुष आणि वणी तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष आहे. डीसीएचसीमध्ये पुसद येथील 87 वर्षीय महिलेचा तर खाजगी रुग्णालयात 52 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय महिलेचा मृत्यु झाला.
शुक्रवारी पॉझेटिव्ह आलेल्या 355 जणांमध्ये 212 पुरुष आणि 143 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 61 रुग्ण पॉझेटिव्ह, मारेगाव 54, पुसद 45, आर्णि 12, बाभुळगाव 14, दारव्हा 28, दिग्रस 24, घाटंजी 8, कळंब 10, महागाव 7, नेर 15, पांढरकवडा 36, राळेगाव 21, उमरखेड 2, वणी 11 आणि इतर शहरातील 7 रुग्ण आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 567554 नमुने पाठविले असून यापैकी 565121 प्राप्त तर 2433 अप्राप्त आहेत. तसेच 495022 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1361 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 918 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1361 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 294 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 283 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 145 रुग्णांसाठी उपयोगात, 381 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 497 उपयोगात तर 697 बेड शिल्लक आहेत.
लसीकरणाबाबत सुचना : कोव्हीडमधून बरे झालेल्यांनी सुट्टी झाल्यानंतर तीन महिन्याच्या कालावधीनंतर लस घ्यावी. लसीकरणानंतर 14 दिवसांनी किंवा आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रक्तदान करता येते. कोव्हीशिल्ड चा दुसरा डोज 12 ते 16 आठवड्यानंतर तर कोव्हॅक्सीनचा दुसरा डोज चार आठवड्यांनतर घ्यावा. बाळांना दूध पाजणा-या सर्व मातांना कोव्हीड लसीकरण करता येते.
०००००००