आपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :-
महागाव तालुक्यातील हिवरा(संगम) येथे कोरोना प्रतिबंधित क्षेत्र नसताना सुद्धा आपत्ती व्यवस्थापन समितीने मुख्य रस्ता बंद केल्याने नागरिकांना,शेतकऱ्यांना अत्यावश्यक सेवेला मुकावे लागत हा रस्ता ताबडतोब खुला करावा अन्यथा या रस्ता खुला करण्यासाठी आंदोलन करण्याचा ईशारा नागरिकांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
राज्य शासनाने कोरोना काळात टाळेबंदीमध्ये शिथिलता देवुन अत्यावश्यक सेवेत समावेश होणाऱ्या दुकाने व आस्थापनांना वेळेत मुभा देऊन ही दुकाने व आस्थापनां चालू ठेवण्यास परवानग्या दिल्या तर दवाखाने, औषधी दुकाने व कृषी उपयोगी साहित्याची दुकाने अंशतः अवधीत मुभा दिली आहे. त्यामुळे सामान्य रुग्ण व शेतकरी बांधव आपल्या कामानिमित्त हिवरा गावात आल्या नंतर गावातील मुख्य प्रवेश रस्ताच बंद असल्याने रुग्णांना व शेतकरी वर्गांना ह्या सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. याच बरोबर सध्या रब्बी हंगामाची सांगता होत असून खरीप लगबग सुरू झाल्याने शेतातील भुईमूग, मूग, तीळ, ज्वारी यासारख्या पिकांची काढणं झाल्यानंतर हे पीक घरी आणण्याची गडबड शेतकरी वर्गांची चालू असून यासाठी बैलबंडी व टॅक्टर चा वापर करण्यात येतो. मात्र गावातील मुख्य रस्ताच बंद असल्याने शेतकरी वर्गाची मोठी गैरसोय होत आहे. याच बाबीला घेऊन आज या रस्त्यावरील अत्यावश्यक सेवेतील दुकान चालकांनी व गावातील शेतकऱ्यांनी महागाव तहसिलदारांना एक निवेदन देऊन हा रस्ता तात्काळ मोकळा करावा अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा निवेदनाद्वारे तहसीलदार महागाव यांना नागरिकांनी दिला आहे. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी वरून संवाद साधला असता त्यांनी याविषयी बोलण्यास टाळाटाळ केली.यावरून हा रस्ता बंद करण्यास शासन निर्णय की राजकीय खेळी याबाबतचे गौडबंगाल नेमके काय आहे यावरून जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे
####चौकट###
सद्या खरीप हंगामाची लगबग सुरू झाली असुन आम्हाला बि बियाणे खते खरेदी करून घरी नेण्यासाठी मुख्य रस्ता बंद असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे रस्ता तत्काळ मोकळा करून शेतकऱ्यांना होणारी अडचण प्रशासनाने दुर करावी
:- विक्रांत पाटील कदम(युवा शेतकरी)
####चौकट####
कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सामान्य रुग्णांची गैरसोय होवु नये याकरीता शासन नियमांचे पालन करून आम्ही आमचे दवाखाने व औषधी दुकाने पुर्णवेळ चालु ठेवीत आहोत परन्तु आपत्ती व्यवस्थापन समितीच्या कठोर निर्णयाने गावातील मुख्य रस्ता बंद असल्याने रुग्ण प्रवेश रस्त्यावर येवुन परत जात आहेत त्यामुळे आम्ही कोरोना काळात देत असलेली सेवा बंद करून घरी राहण्यास हरकत नसावी.मुख्य रस्ता बंद असल्याने रुग्णांना उपचाराविना परत जावे लागत असल्याने त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
:- डॉ.पंकज कदम( संचालक मातोश्री क्लिनिक)