आरोग्य विभागाच्या फेक पदभरती जाहिरातीबाबत तक्रार दाखल ; बेरोजगार उमेदवारांनी बळी न पडण्याचे आवाहन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 17 :- जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्या नावाने पदभरतीबाबत सोशल मिडीयावर फिरत असलेल्या फेक जाहिरातीसंदर्भात यवतमाळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रिक्त पदाच्या सरळ सेवा पध्दतीने पदभरतीबाबत 16 मे पासून सोशल मिडीयावर फेक जाहिरात प्रसारीत होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र अशा कोणत्याही प्रकारची जाहिरात जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत प्रसिध्द करण्यात आली नसून फेक जाहिरातीत असलेले रिक्त पदे सरळसेवा पध्दतीने भरण्याची कोणत्याही प्रकारची पदभरती प्रक्रिया जिल्हा आरोग्य कार्यालयामार्फत सुरू नाही, असे कळविण्यात आले आहे.
सोशल मिडीयावर प्रसारीत होणारी जाहिरात ही पूर्णपणे खोटी असून बेरोजगार उमेदवारांची दिशाभुल करणारी आहे. तसेच भविष्यात अनुचित प्रकारास वाव देणारी असल्यामुळे नागरिकांनी या फेक जाहिरातीला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने केले आहे.
अशा प्रकारची आहे फेक जाहिरात : नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात अर्धवेळ एमबीबीएस (1 पद), स्टाफ नर्स (6 पदे), आरोग्य सेवक (26 पदे), ए.एन.एम (7 पदे), औषध निर्माता (5 पदे) आणि लॅब टेक्निशियन (6 पद) या पदासाठी 10 ते 25 मे 2021 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. सदर फेक जाहिरातीमध्ये पदानुसार शैक्षणिक अर्हता नमुद केली असून मासिक वेतनाचासुध्दा उल्लेख आहे.
०००००००

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….