पालकमंत्र्यांच्या हस्ते स्त्री रुग्णालयातील कोव्हीड हेल्थ सेंटरचे उद्घाटन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 12 :- जिल्ह्यात कोरोनाबाधितांवर त्वरीत उपचार व्हावे या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरचे उद्घाटन राज्याचे रोजगार हमी तथा फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार संजय राठोड, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, उपजिल्हाधिकारी सविता चौधर आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी परिचारिका दिनानिमित्त फ्लोरेंन्स नाईटींगेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण तसेच दीपप्रज्वलन करून पालकमंत्र्यांनी अकस्मिक विभाग, प्रयोगशाळा, स्वॅब टेस्टिंग केंद्र, फिवर क्लिनीक, नमुना संकलन कक्ष, रक्त तपासणी आदींची पाहणी केली. तसेच उर्वरीत काम त्वरीत पूर्ण करा, अशा सुचना दिल्या.
येथील स्त्री रुग्णालयात एकूण 180 बेड नियोजन असून सद्यस्थितीत 100 बेड उपलब्ध आहेत. तर 80 बेड प्रस्तावित आहेत. यात ऑक्सीजन बेड 42 आणि नॉर्मल बेड 58 आहे. तसेच सेंट्रल ऑक्सीजन पाईपलाईनचे 42 पॉईंट असून 10 लिटर प्रति मिनीट क्षमता असलेले पाच ऑक्सीजन कॉन्सेंन्ट्रेटर आहे. तसेच 20 किलो लीटर लिक्विड ऑक्सीजन टँक आणि प्रस्तावित 608 एलएमपी ऑक्सीजन प्लाँट व प्रतिदिवस 135 जंबो सिलींडरचे नियोजन करण्यात आले आहे.
००००००


सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….