पुसद तालुक्यात गावनिहाय लसीकरणाचे नियोजन करा :- भाजपा युवा मोर्चा ची मागणी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लसीकरणाबद्दल जनजागृती करून मोठ्या प्रमाणात लसीकरण वाढविणे गरजेचे आहे.
सध्या पुसद तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू आहे. परंतु तेथे योग्य प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध नसल्याने त्या आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या गावातील लोकांना रोज ये जा करावी लागत आहे त्यामुळे तेथे योग्य प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तसेच त्या आरोग्य केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. वाढत्या गर्दीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच त्या आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या गावातील अंतर अधिक असल्याने वयोवृद्ध नागरिकांना ये जा करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी व वयोवृद्ध यांच्या सोयीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत गावनिहाय लसीकरण शिबीर घ्यावे अशी मागणी भाजपा युवा मोर्चाने केली आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राहुल खंदारे पाटील, जिल्हा सचिव सनि देशमुख, तालुकाध्यक्ष शुभम काळबांडे,शहराध्यक्ष सौरव जयस्वाल, विकास राठोड, आशिष चव्हाण आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.


“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच.”
९ नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर बंजारा समाजाचा विशाल मोर्चा ; निरंजन नाईक होणार सहभागी….