कोरोना पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने ईद साजरी करून गोर गरीबांना मदत करा :- माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांचे आव्हाहन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहुर (राजकीरण देशमुख) :- रमजानमध्ये मोठ्या प्रमाणात जकात आणि सदका (दान) देण्यात येते.गरजू पर्यंत अन्नधान्य पोहचविण्यासाठी
चे कार्य माहूर शहरातील सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन सामूहिक रित्या केल्याने गोर गरीबांच्या घरांपर्यंत अन्नधान्य तसेच अन्य जीवनावश्यक वस्तू काही प्रमाणात का होईना पोहचल्या आहेत.याच पद्धतीने नियोजन करून कोरोना पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने ईद साजरी करून गोर गरीबांना मदत करा असे अहवान माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी केले आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य आजाराने देशात थैमान घातल्याने या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारने लाँकडाऊन जाहीर केले आहे.गेल्या दीड वर्षापासून सर्व व्यवहार बंद असल्याने गोरगरीब लोकांच्या हाताला काम नाही त्यांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे. काही कुटूंबाची रोज मजुरी किवा काहि केल्या शिवाय चूल पेटत नाही अशा कुटूंबापुढे रमजान ईद कशी करायची असा प्रश्न पडला आहे, तेंव्हा जी कुटूंब सूखी समृद्ध आहेत आशा कुटूंबानी पवित्र रमजान महिन्यात ईद ची खरेदी न करता आपल्या शेजारी, व गावात असणाऱ्या गरिबांची ईद साजरी करण्यासाठी त्यांना मदत करावी व कोरानाचा प्रदुभाव रोखण्यासाठी आपलेजीव धोक्यात घालुन पोलीस डाँक्टर नर्स सफाई कामगार हे काम करित आहे याच्या साठी प्रार्थना करावी असे अहवान ही माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी केले आहे.राज्यात व देशात रक्ताचा आलेला तुटवडा लक्षात घेता माहूर तालुक्यात समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने भव्य महा रक्तदान शिबिर घेण्या बाबत जामा मस्जिद माहूर येथे समाजातील प्रमुख जबाबदार लोकांची बैठक झाली असून जमात चे आमिर,मस्जिद चे सदर व नवयुवकानी या साथी तय्यारी दर्शविल्याने ईद नंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांशी बातचीत करून हे शिबिर घेण्यात येईल अशी माहिती जमात चे आमिर आरीफ बावानी,सदर नासिर सौदागर,शेख ताहेर,जमीर मलणस, हाजी रऊफ सौदागर,बाबू खा फारुकी,उस्मान खान पठाण, साजिद खान,
यांनी दिली आहे.